बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता दिवस (इंजिनिअर्स डे) साजरा करण्यात आला. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या १६४ व्या जन्मदिनानिमित्त बेळगाव येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या एचडी बाळेकुंद्री हॉलमध्ये हा कार्यक्रम मोठा उत्साहात पार पडला. यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून जैन इंजिनिअरिंग कॉलेज बेळगावचे प्राचार्य जे. शिवकुमार व प्रमुख वक्ते म्हणून बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग कॉलेज कोल्हापूरचे डॉ. सुहास सपाटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभियंता एस. वाय. कुंदरर्गी हे होते. यावेळी बेळगाव शहराचे सेवानिवृत्त वरिष्ठ अभियंता एम. एस. चिकमट (वय १०३), सेवानिवृत्त सहाय्यक कार्यकारी अभियंता शांताप्पा बेळंकी (वय ९९) यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे के.एल.ई.सोसायटीच्या डॉ. एम. एस. शेषगिरी इंजिनिअरिंग कॉलेज बेळगाव येथील डिन अकॅडमीक्सचे प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा त्यांनी केलेल्या अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनाबद्दल त्यांचा खास सत्कार करण्यात आला. अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांना “प्रतिष्ठित तज्ञ अभियंता” ही उपाधी बहाल करून शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय विद्यापीठ राजस्थानचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितसह विविध क्षेत्रातील अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.