बेळगाव : कर्नाटक राज्याचे गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांच्या वक्तव्याने प्रेरित होऊन राज्यात पॅलेस्टाईन ध्वज फडकवणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून बेळगाव शहरातही पॅलेस्टाईन राष्ट्रध्वजाच्या रंगासारखे मंडप उभारणीचे काम सुरू आहे.
बेळगावच्या दरबार गल्लीत पॅलेस्टाईन राष्ट्रध्वज सारखा मंडप उभारण्यात येत आहे. आतापर्यंत पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यापुरता मर्यादित होता. पण आता पॅलेस्टाईन ध्वजाच्या रंगांचा मोठा मंडप उभारणीचे काम सुरू आहे.
बेळगाव शहर पोलिसांनी दिलेल्या आदेशाकडे लक्ष न देता मंडप उभारण्यात येत आहे.
बेळगाव शहरातील अतिसंवेदनशील भागात दोनशे मीटर रस्त्यालगत मंडप उभारण्यात आला आहे. उद्या काढण्यात येणाऱ्या ईद मिलाद मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू असून, आजपासून रस्ते सजवण्यात येत आहेत.