बेळगाव : बेळवट्टी – बाकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त सभासदांचा तसेच गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. बी. देसाई होते.
संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर ज्येष्ठ सल्लागार लुमाण्णा नलावडे, सातेरी चांदीलकर, शट्टूप्पा पाटील, गणपत पाटील, मारुती कांबळे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष परसराम गाडेकर, ज्येष्ठ संचालक अर्जुन पाटील, पांडुरंग नाईक, वैष्णवी सुतार यांनी विविध देवतांच्या प्रतिमांचे पूजन केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात प्रदीर्घ सेवा बजावून निवृत्त झालेले आर. बी. देसाई, तुकाराम कांबळे, विठ्ठल चौगुले, नामदेव गाडेकर, विष्णू चांदिलकर, बाळकृष्ण नलावडे, तुकाराम नलावडे यांचा व जेष्ठ नागरिक दत्तू नलावडे, पांडुरंग देसाई, गणपत पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर नलावडे यांनी वार्षिक अहवाल सादर करून अंदाजपत्रक सादर केले, त्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष बी. बी. देसाई यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. संचालक नारायण नलावडे, पांडुरंग नाईक, अशोक मजुकर यांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून काही सूचना केल्या.
तुकाराम कांबळे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास संचालक आप्पू नाकाडी, मधू नलावडे, सावित्री चौगुले, निर्मला गायकवाड यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्तित होते.