बेळगाव : तिलारी धरणाचे पाणी कालव्याने मार्कंडेय नदीला जोडण्याच्या प्रकल्पासंदर्भात चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्यात नुकतीच एक सकारात्मक औपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचे सोयीस्कर राजकारण करत चंदगड येथील दौलत साखर कारखान्याचे संचालक मानसिंग खोराटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सीमावासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. बेळगावकर आणि चंदगडकरांच्या सलोख्याच्या संबंधावर वादग्रस्त विधान केल्यामुळे मानसिंग खोराटे यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बेळगावकर आणि चंदगडवासीय बहुसंख्येने रस्त्यावर उतरले.
यावेळी तुडये, बिजगर्णी, बेळवट्टी, बाची, बडस, कुद्रेमनी, शिनोळी, तुरमुरी, उचगाव, बेळगुंदी, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक तसेच बेळगाव सीमालगतच्या गावातील शेतकऱ्यांनी बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली बाची ते शिनोळी निषेध मोर्चा काढला.
Belgaum Varta Belgaum Varta