बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग, कुस्ती व कराटे खेळ प्रकारात एकूण 09 खेळाडूंची पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात 40 वजनी गटात आदिती पाटील, 45 वजनी गटात सईशा गौडाळकर, 71 वजनी गटात एकता राऊत व 81 अधिक वजनी गटात श्रद्धा पाटील तसेच मुलांमध्ये 49 वजनी गटात श्रवण खुडे व 67 वजनी गटात रघुवीर देसाई यांनी यश मिळविले आहे.
कुस्ती खेळ प्रकारात 40 वजनी गटात गौतमी पाटील व 55 वजनी गटात सिद्धी निलजकर यांनी यश मिळविले आहे.
कराटे खेळ प्रकारात 40 वजनी गटात अक्षरा देमाने हिने यश मिळविले आहे.
वरील सर्व खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण ऊडकेकर, शिक्षण संयोजक निला आपटे, क्रीडा शिक्षक महेश हागिदळे, दत्ता पाटील, पूजा संताजी व श्रीधर बेनाळकर यांचे मार्गदर्शन तर शाळेचे इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta