
बेळगाव : हिंदी भाषेला खूप मोठा इतिहास आहे. हिंदी भाषेचे साहित्य समृद्ध आहे. आजच्या सोशल मीडियामुळे हिंदी भाषेची लोकप्रियता वाढत आहे. हिंदी भाषेला काका कालेलकर, सेठ गोविंददास आणि हजारी प्रसाद द्विवेदी यांनी गौरव प्राप्त करुन दिला आहे. हिंदी भाषा युनोस्कोने सुद्धा महत्व दिलेले आहे, असे प्रतिपादन नई दिल्ली येथील प्रसिद्ध हिन्दी साहित्यकार डॉ. मोहनदास नैमिशराय यांनी केले ते बेळगाव येथील के. एल. ई. संस्थेच्या लिंगराज स्वायत्त महाविद्यालय व लिंगराज पदवी पूर्व महाविद्यालयाच्या हिन्दी विभागाच्या आयोजित हिंदी दिवस समारोह समारंभाच्या प्रमुख पाहुणे म्हणून हिन्दी भाषा आणि दलित साहित्य या विषयावर बोलत होते.
लिंगराज स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनमनी अध्यक्षस्थानी होते. हा समारोह लिंगराज महाविद्यालयाच्या केंद्रीय सभागृहात आयोजित केला गेला होता. व्यासपीठावर लिंगराज पदवी पूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती गिरिजा हिरेमठ आणि प्रा. अर्जुन कांबळे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. मोहनदास नैमिशराय पुढे म्हणाले की, हिंदी भाषेला आणखीन समृद्ध करण्याचे काम दलित साहित्याने केलेले आहे. हिंदी दलित साहित्य मराठी दलित साहित्यापासून प्रभावित झालेले आहे. दलितांची भाषा हिन्दीमध्ये लोकप्रियता प्राप्त केलेली आहे. हिंदी भाषेच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावे लागतील. त्यांनी दलित साहित्याचा संक्षिप्त परिचय करुन दिला. यावेळी लिंगराज पदवी पूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती गिरिजा हिरेमठ यांनी हिन्दी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना सागितले.
या समारोहाची सुरुवात कु. मुक्ता कुलकर्णी आणि कु. संगीता एडके यांच्या प्रार्थना गीताने झाली. या समारंभाचे प्रास्ताविक और स्वागत भाषण हिंदी विभाग प्रमुख प्रा. अर्जुन कांबळे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या समारंभाचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लिंगराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनमनी यांनी पुष्पगुच्छ देवून केले. या वेळी प्रा. सीमा जनवाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. या प्रसंगी कु. वेदांत फडके, कु. श्रेया बडिगेर, कु. सृष्टि यांनी हिंदी भाषेविषयी कविता, शायरी व मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी प्रा सीमा जनवाडे डॉ. कलावती निंबाळकर, प्रा. व्ही. पी. हिरेमठ आणि कु. विनायक पाटिल यांनी खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. डेलनाझ कांगा आणि हरिप्रिया यांनी केले. यावेळी प्रा. प्रशांत कोन्नूर, प्रा. दिशा, प्रा. सुषमा पूजार आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta