बेळगाव : महानगरपालिकेच्या भ्रष्ट आणि ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधींच्या विकासकामावर पाणी सोडण्याची वेळ बेळगाव महानगरपालिकेवर आली आहे. लोकप्रतिनिधींच्या हुकूमशाहीमुळे महानगपालिकेवर ही नामुष्की ओढवली असल्याची खंत जाणकार व्यक्त करत आहेत.
बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते ओल्ड पी.बी. रोड रास्ता तसेच खंजर गल्ली येथील रस्ता हे एक ताजे उदाहरण आहे. अशी अनेक कामे न्यायप्रविष्ट असून निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
संबंधित प्रकरणात नुकसानभरपाई देण्यासाठी महानगरपालिका घरपट्टी वाढवून सामान्य जनतेच्या खिशाला भुर्दंड पडणार आहे. लोकप्रतिनिधींच्या मनमानी कारभाराचा भुर्दंड सामान्य जनतेवर न घालता तत्कालीन संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. त्याचप्रमाणे इतर प्रलंबित विकासकामांच्या मागणीवर सोमवारी विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चाला श्रीरामसेना हिंदुस्थानकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला असून सर्व नागरिकांना या मोर्चाममध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम सेना हिंदूस्थानच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.