अथणी : अथणी शहरासह विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात अथणी पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या चोरट्यांकडून ७ लाख ७५ हजार रू. किंमतीच्या १३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अमूल जितेंद्र पवार (रा. सिंधुर ता. जत, जि. सांगली, महाराष्ट्र), लखन सुंगारे (रा. मदबावी, ता. अथणी, जि. बेळगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. नुकतीच अथणी शहरातील शिवाजी सर्कलमध्ये संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे मान्य केले.
दरम्यान अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक भीमाशंकर गुळेद यांनी दिली आहे.
बेळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलिस अधिक्षक आर.बी. बसर्गी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अथणीचे पोलिस डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, सीपीआय रवींद्र नायकोडी यांच्या मार्गदर्शनाखाली अथणी पोलिसांच्या पथकाने केलेल्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.