बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीच्या वतीने मालमत्ता करात १० टक्के वाढ केल्याने ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीला घेराव घालून संताप व्यक्त केला.
हिंडलगा गावात मालमत्ता करात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. ग्रामस्थांचे हित न जपणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचा काय उपयोग असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. ग्रा पं सदस्यांनी जनहिताचे रक्षण करावे. त्यांच्या कार्याची प्रत जनतेला द्यायला हवी. आम्ही कायदेशीर लढाईसाठी तयार आहोत अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
काकती, बेनकनहळ्ळी, कंग्राळी खुर्द आणि बुद्रुक येथील मालमत्ता कर हिंडलगा ग्राम पंचायतीच्या तुलनेत कमी आहे. मात्र याठिकाणी हे धोरण असेच सुरू राहिल्यास ग्रामपंचायतीनेच आपली घरे विकत घ्यावीत, ती भाडेतत्वावर द्यावीत, आणि त्यातून कर वसूल करून घ्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.