सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा सामंत यांची उपस्थिती
बेळगाव : दिनांक 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत सुरू असलेल्या मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रसेवा दलाच्या शिबिराची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पत्रकार, दिग्दर्शक व झी मराठीचे निर्मितीप्रमुख नितीन वैद्य उपस्थित होते. त्यांच्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा सामंत- पुरव याही उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, सचिव विक्रम पाटील, प्रा. सुरेश पाटील, नीला आपटे उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक गजानन सावंत यांनी केले व प्रास्ताविक नीला आपटे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख माया पाटील व गौरी चौगुले यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सुभाष ओऊळकर यांनी केले. शिबिरामध्ये राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते बाबा नदाफ, सदाभाऊ मगदूम, शाहिस्ता यांनी गेल्या पाच दिवसात विद्यार्थ्यांना विविध कलाप्रकारांचे मार्गदर्शन केले होते यामध्ये बर्ची नृत्य ,झांज, लेझीम यासारखे कलाप्रकार विद्यार्थी शिकले होते. या कलाप्रकारांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित पथनाट्याचे सादरीकरण ही केले. या शिबिरामध्ये बौद्धिक सत्रामध्ये मार्गदर्शन केलेले शिक्षक इंद्रजीत मोरे, शैला पाटील, कमल हलगेकर, सविता पवार, स्नेहल पोटे, मुक्ता अलगोंडी या शिक्षकांचे पाहुण्यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य यांनी या शिबिराचे महत्त्व व सद्यस्थितीत या विचारांचे विद्यार्थ्यांनसाठी असलेले महत्त्व याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच मराठी विद्यानिकेतन दरवर्षी या शिबिराच्या आयोजन करते त्याबद्दल शाळेचेही अभिनंदन केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राध्यापक सुरेश पाटील यांनी शाळेच्या उपक्रमाचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. शिबिराचे नियोजन शिक्षण संयोजक नीला आपटे यांनी केले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी शशिकांत धामणेकर, रूपाली हळदणकर, शबाना मुजावर, स्नेहल बेळगावकर, माया पाटील, अक्षता मेलाशंकर, अरुण बाळेकुंद्री, शांताराम पाटील यांचे सहकार्य लाभले, या सर्व शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. विद्यार्थी परम पाटील, सायली भोसले, अक्षता देमाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार एन. सी. उडकेकर यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन रूपाली हळदणकर यांनी केले.