Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये बैलहोंगल येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक मुलांच्या गटात रितेश मुचंडीकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात शाळेची विद्यार्थिनी श्रावणी पेडणेकर हिची जिल्हास्तरीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. तसेच आंबेवाडी या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत माध्यमिक विभागाच्या मुलींच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. अशा प्रकारे बुद्धिबळ, क्रिकेट आणि खो-खो स्पर्धांमध्ये शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, मुख्याध्यापक गजानन सावंत, मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, शिक्षण संयोजक नीला आपटे यांनी गौरव केला आहे आणि पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील, महेश हागिदले, पूजा संताजी, खो-खो कोच श्रीधर बेन्नाळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *