बेळगाव : बेळगाव हिंडलगा कारागृहात एका ट्रायल कैद्यावर चार सहकारी कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
हितेश चौहान असे या कैद्याचे नाव असून त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. बसवराज दड्डी, बसू नाईक, सविना दड्डी, वाघमोरे अशी हल्ला करणाऱ्या कैद्यांची नावे आहेत.
हल्ला केलेल्या तरुणांच्या एका नातेवाईकावर हितेशने हल्ला केला होता आणि त्यामुळे त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात येत असताना चार कैद्यांनी हितेशवर जीवघेणा हल्ला केला. हितेशच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta