बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची समीक्षा बाळकृष्ण भोसले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिचा सत्कार शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बैलहोंगल येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक मुलींच्या गटात संत मीरा शाळेच्या समिक्षा भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावित आपली निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शहराचे गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, आय. डी. हिरेमठ, शहराच्या पीईओ जहिदा पटेल यांच्या हस्ते समीक्षा भोसले हिचा म्हैसूर फेटा बांधून सत्कार करण्यात आला, तसेच तिला आगामी होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आला.
समीक्षा भोसलेला शाळेच्या क्रीडाशिक्षिका अनुराधा पुरी, चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta