Monday , December 8 2025
Breaking News

जायंट्स इंटरनॅशनलचे वर्ल्ड डेप्युटी चेअरमन प्रफुल्ल जोशी यांची जायंट्स भवनला सदिच्छा भेट

Spread the love

 

बेळगाव : जायंट्स फेडरेशन सहाच्या कार्यक्रमासाठी बेळगावला आलेले जायंट्स इंटरनॅशनलचे वर्ल्ड डेप्युटी चेअरमन प्रफुल्ल जोशी यांनी जायंट्स भवनला सदिच्छा भेट दिली त्यांच्यासमवेत सेंट्रल कमिटी सदस्य दिनकर अमीन होते.
त्यांचे स्वागत जायंट्स मेनचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले.
जायंट्स सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील आणि सहकाऱ्यांनी प्रफुल्ल जोशी यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.
यावेळी बोलताना प्रफुल्ल जोशी यांनी जायंट्स मेनच्या स्थापनेवेळी मी बेळगावला आलो होतो त्यानंतर जवळपास अडतीस वर्षांनी आलो आहे. बेळगाव शहरात खूप बदल झालेला दिसत असून आपल्या संघटनेने सुद्धा खूप प्रगती केल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच जायंट्स भवन सारखी वास्तू उभारल्याबद्दल अभिनंदन केले आणि भविष्यात संघटनेच्या सदस्य वाढीकडे लक्ष देण्यास सांगितले.
यावेळी दिनकर अमीन यांनी बोलताना जायंट्स मेनबद्दल गौरवोद्गार काढताना प्रत्येकाचे विशेष कौतुक केले अन गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या माजी अध्यक्षांनी सतत कार्यरत राहून यापुढेही जायंट्सची पताका सतत उंचावत ठेवण्याबद्दल कानमंत्र दिला. विशेष समिती सदस्य मोहन कारेकर यांनी जायंट्स भवनच्या उभारणीबद्दल विस्तृत माहिती दिली.
यावेळी फेडरेशन समन्वयक अरुणगौडा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी तर आभार सचिव यल्लप्पा पाटील यांनी मानले.
यावेळी फेडरेशन संचालक शिवकुमार हिरेमठ, माजी अध्यक्ष सुनिल मुतगेकर, संजय पाटील, सुनिल भोसले, अशोक हलगेकर, मदन बामणे, विकास कलघटगी, अनंत जांगळे, उपाध्यक्ष विजय बनसुर, खजिनदार अनिल चौगुले, संचालक विश्वास पवार, मधू बेळगावकर, राजू बांदिवडेकर, अरुण काळे, मुकुंद महागावकर, अरविंद देशपांडे, अजित कोकणे, आनंद कुलकर्णी, पद्मप्रसाद हुली, आनंद आपटेकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

टिळकवाडी येथील न्यू शिवाजी कॉलनीतील परिसर बनला कचरा डेपो!

Spread the love  बेळगाव : मंत्री महोदय येती गावा, तोची दिवाळी दसरा अशी काहीशी स्थिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *