Wednesday , March 4 2026
Breaking News

सीमोल्लंघन मैदानाची जायंट्स मेन कडून स्वच्छता

Spread the love

 

बेळगाव : विजयादशमी दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतन मैदानावर साजरा केला जातो. वेगवेगळ्या भागातून देवाच्या पालख्या तिथे येतात. सोने लुटण्याबरोबरच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल्स सुद्धा लावले जातात.
बेळगाव शहरातील जनता मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी उपस्थित असते सामाजिक बांधिलकीची जाण म्हणून 12 वर्षापासून जायंट्सच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

जायंटस् मेनच्या माध्यमातून रविवारी सकाळी सुद्धा मैदानातील सर्व कचरा गोळा करण्यात आला. पेपरची रद्दी, प्लास्टिकचे ग्लास, कप, प्लेट्स, चमचे इतर कचरा एकत्र करण्यात आला आणि कॅटोंमेटच्या कचरा गाडी टाकण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *