बेळगाव : मोतीराम देसाई हे गावात दूध संकलन करत असताना या व्यवसायात उमेश देसाई यांनी लक्ष घातल्यानंतर ऊर्जितावस्था आली. वडिलांना मदत व्हावी म्हणून उमेश यांनी लक्ष घालताच हा व्यवसाय नावारुपाला आणला. नैसर्गिक चवीमुळे उपपदार्थांना मागणी वाढली आहे. उमेश यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रमांनाही भरीव मदत केली आहे, असे प्रतिपादन एपीएमसी माजी अध्यक्ष युवराज कदम यांनी केले.
बेळगाव – वेंगुर्ला राज्य मार्गावरील बेळगुंदी क्रॉस येथील श्री गणेश दूध संकलन केंद्राचा दहावा वर्धापनदिन गणेश दूध संकलन केंद्रात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. गणेश दूधचे संस्थापक मोतीराम देसाई, रुक्मिणी देसाई, युवराज कदम, लॅण्ड ट्रिब्यूनलचे माजी संचालक बाळासाहेब देसाई, हॉटेल उद्योजक मधु बेळगावकर, ग्रा. पं. माजी सदस्य रामा कदम, देसाई भाऊबंद कमिटीचे अध्यक्ष डी. बी. देसाई, जोतिबा डोणकरी, आजरा अर्बनचे संचालक हरिशचंद्र पाटील यांच्या हस्ते गणेश पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचा शाल, मानचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक भाषणात ‘गणेश दूध’ चे चालक उमेश उर्फ प्रवीण देसाई म्हणाले, शेतकर्यांनी स्थानिक उद्योगावर विश्वास टाकल्याने प्रगतीकडे झेप घेणे शक्य होत आहे. या कार्यक्रमाला अलतगा, हंदिगनूर, बोडकेनट्टी, नावगे येथील दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मल्लापा पाटील, परशराम हुद्दार, एम. टी. पाटील, आप्पाजी पाटील, डॉ. ओमाणी कडोलकर, चंद्रकांत बेळगावकर, लक्ष्मण कामती, खोमाण्णा धामणेकर, हिराचंद नावगेकर, परशराम कर्लेकर, अरुण कर्लेकर यांच्यासह शेतकरी व ग्राहक उपस्थित होते. सुधाकर करटे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta