बेळगाव : मंगळवारी होणाऱ्या बसवण कुडचीतील श्री मरगाई देवीची मूर्ती स्थापना आणि कळसारोहण कार्यक्रमानिमित्त आज रविवार सकाळपासून बसवण कुडचीत मूर्तीची मिरवणूक होणार आहे. नागेश स्वामी दिवटे यांच्या घरापासून मिरवणुकीला सुरवात होणार आहे.
बसवण कुडची येथील देवराज अर्स कॉलनीमध्ये जुने प्राचीन मरगाई मंदिर काढून तिथे नवीन मंदिर बांधले आहे, त्या मंदिराचा कळसारोहण, गृहप्रवेश व वास्तुशांती होणार आहे. रविवारी सकाळी देवीच्या मूर्तीची गावात वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवारी मंदिरची वास्तुशांती व गृहप्रवेश करून मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे, मंगळवारी सकाळी विधिवत पूजा होम हवन होणार आहे . मरगाई देवीच्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे, मंगळवारी सकाळी 6 ते 7 मंदिराची वास्तुशांती, होमपुजन होवून सकाळी 7 ते 9 श्री मरगाई देवीच्या मूर्तीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पूजा करून महाप्रसादाला सुरवात होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे मंदिराचे अध्यक्ष आप्पुनी चौगुले, उपाध्यक्ष अनिल चौगले व बसवण कुडची मंदिर पंच कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.