बेळगाव : संत श्री जलाराम बापा यांच्या धर्मपत्नी मा. विरबाई माता यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील संत श्री जलाराम फाउंडेशनतर्फे बीम्स हॉस्पिटलमधील निराधार 22 रुग्णांना आज शनिवारी स्वेटर, ब्लॅंकेट, फळे, बिस्किटे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.
जगात ज्यांचे कोणीही नाही. घरदार नसल्याने जे रस्त्यावर आले आहेत. वयोवृद्ध होण्याबरोबरच सतत आजारी पडणे आणि स्मरणशक्ती कमी होणे या कारणामुळे वृद्धाश्रमांमध्ये देखील ज्याना राहू दिले जात नाही, अशा गरजू लोकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने श्री जलाराम फाउंडेशनतर्फे आज उपरोक्त उपक्रम राबवण्यात आला. बीम्स हॉस्पिटलमधील रेस्पिरेटरी वाॅर्डमध्ये असलेल्या 18 पुरुष आणि 4 महिला अशा एकूण 22 निराधार लोकांना संत श्री जलाराम फाउंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी स्वेटर आणि ब्लॅंकेट तसेच वसंत उत्सवाची सुरुवात होत असल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ बुंदीचे लाडू, संत्री, केळी, बिस्किटं आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण वाटप केले.
याप्रसंगी संत श्री जलाराम फाउंडेशनचे अध्यक्ष कनुभाई ठक्कर, बिपिनभाई सोमैय्या, किरणभाई मेहता, देवेंद्रभाई गुजराती, अमितभाई ठक्कर, ललितभाई शाह आदी उपस्थित होते. गुजरातमधील विरपुर येथे संत श्री जलाराम फाउंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या अन्नदान सेवेचा वर्धापन दिन आणि संत श्री जलाराम बाप्पा यांच्या पत्नी वीरबाई माता यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीम्स हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान संत श्री जलाराम फाउंडेशन बेळगाव यांच्यातर्फे दर गुरुवारी अन्नछत्र चालविले जाते. ज्याचा जवळपास 200 -250 गरजू लोक लाभ घेत असतात हे विशेष होय.
Check Also
चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …