बेळगांव : मध्यप्रदेश सतना येथे होणाऱ्या 35 व्या अखिल भारतीय विद्याभारती राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या अथलेटिक्स खेळाडू रवाना झाले आहेत.
सतना येथील सरस्वती विद्यालय शाळेच्या मैदानावर होणाऱ्या 35 व्या राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेसाठी अनगोळ येथील शाळेचे खेळाडू समीक्षा विनायक बुद्रुक, नताशा महादेव चंदगडकर, भावना भाऊ बेर्डे हे खेळाडू शाळेच्या क्रीडा शिक्षिका मयुरी पिंगट यांच्यासह रवाना झाले आहेत.
सरस्वती विद्यापीठ विजयवाडा आंध्रप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या विद्याभारती क्षेत्रीय अथेलीटिक्स स्पर्धेत समीक्षा बुद्रुक हिने 3000 मीटर धावणे व 100 व 400 मीटर रिले प्रकारात तीन सुवर्णपदक पटकाविले आहे, नताशा चंदगडकर हिने लांबउडी तिहेरीउडी व 100 मीटर रिले प्रकारात 3 सुवर्णपदक पटकाविले तर प्राथमिक मुलींच्या गटात भावना बेर्डे हिने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक, 100 मीटर रिले प्रथम क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या खेळाडूंना शाळेच्या क्रीडा शिक्षिका मयुरी पिंगट, शिवकुमार सुतार, यश पाटील, अनुराधा पुरी, चंद्रकांत पाटील, यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta