बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने उद्योगरत्न रतन टाटा यांची आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रतन टाटा यांच्या फोटोला पाहूण्यांच्या हस्ते आदरांजली अर्पण करण्यात आली. पाहूण्यांचे स्वागत अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर यांनी केले.सर्वांचे स्वागत श्री. सुभाष ओऊळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. इंद्रजीत मोरे यांनी केले. पाहूण्यांची ओळख श्री. शिवराज चव्हाण यांनी केली.
आदरांजली सभेत सर्व प्रथम रतन टाटा यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य याविषयी निलू आपटे यांनी विचार व्यक्त केले. यामध्ये टाटा कुटुंबात जमशेटजी टाटा यांच्यापासून ते रतन टाटा यांच्यापर्यंत सामाजिक, शैक्षणिक व ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरीव आर्थिक मदत करत आलेले आहेत. रतन टाटा यांनी आपल्या हयातीत आपल्या उत्पन्नातील 66% उत्पन्न हे देणगी स्वरुपात देशाला दिली आहे. सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी ही भरीव देणगी दिली आहे. देशातील पहिले कॅन्सर हाॅस्पिटल टाटा कुटुंबाकडून सुरू करण्यात आले, अशा अनेक गोष्टींचा विचार मांडले.
प्रा. डॉ. चेतन कोटबागे यांनी आपले विचार मांडताना रतन टाटा यांचे औद्योगिक विचार मांडले. यामध्ये रतन टाटा यांनी नेहमीच नाविन्यपूर्ण योजना व प्रयोग राबविण्याकडे कल होता. उद्योगात प्रत्येक वेळी नवनवीन योजना सुरू केल्या. आपल्या उद्योगात पहिल्यांदा त्यांनी यांत्रिकीकरण राबविले. शिक्षण, दवाखाना, ग्रामीण विकास, मानवतावाद, सामाजिक भान, देशहित साधून टाटा उद्योग समुहाला यशोशिखरावर नेल्याचे दाखले दिले. देशातील आर्थिक विषमतेवर रतन टाटांनी सकारात्मक उपाययोजना केल्या होत्या. आभार प्रदर्शन श्री. धीरजसिंह राजपूत यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती सविता पवार यांनी केले.
स्पीचलेस व्यक्ती मत्व ,रतनजी टाटा यांना हेदयपूर्क आदरांजली..