बेळगाव : येत्या १ नोव्हेंबर काळ्या दिना निमित्त महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक मंगळवार दिनांक २९/१०/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी, बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे, तरी सर्व पदाधिकारी, संघटक, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.