बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाचे चौथे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. सुनिलकुमार लवटे अध्यक्षस्थानी राहाणार आहेत.
प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते.
साने गुरुजी यांचे २०२४ हे १२५ वे जयंती वर्ष आहे. यामुळे या संमेलनाची साने गुरुजी ही मध्यवर्ती संकल्पना आहे.
चार सत्रात होणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, विशेष व्याख्यान, काव्य संमेलन व मनोरंजन असे कार्यक्रम होणार असून त्यासाठी नामवंतांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. बैठकीस प्रा. दत्ता नाडगौडा, कृष्णा शहापूरकर, जोतिबा अगसीमनी, मधु पाटील, शिवलिला मिसाळे, अर्जुन सांगावकर, किर्तीकुमार दोसी, महेश राऊत, संदीप मुतगेकर, सागर मरगाण्णाचे आदी सदस्य बैठकीस उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta