बेळगाव : ऐन दिवाळीत संपूर्ण शहर विद्युत रोषणाईने सजले आहे तर दुसरीकडे शहरातील उद्यमबाग परिसरातील पथदीप मागील सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत त्यामुळे येथील कारखान्यात रात्रपाळीला कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंधारातूनच ये- जा करावी लागत आहे. येथील कारखानदारांनी सदर बाब संबंधित लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली मात्र लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष केले. ही बाब समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या लक्षात येताच रमाकांत दादांनी उद्यमबाग परिसरात भेट दिली आणि येथील कारखानादारांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तात्काळ हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. उद्या दिवाळी लक्ष्मीपूजनाचा सण आहे त्यानिमित्ताने येथील कारखानदार लक्ष्मीपूजन करतात त्यामुळे महिलाना अंधारात रस्त्यावरून ये-जा करणे त्रासाचे होणार त्यामुळे उद्यमबाग परिसरातील पथदीप तात्काळ सुरू करण्याची सूचना हेस्कॉम अधिकाऱ्यांना रमाकांत कोंडुस्कर यांनी केली त्यामुळे येथील कारखानदारात समाधान पसरले आहे.