बेळगांव : दिवाळीसाठी बेळगावात आलेल्या परगावच्या नागरिकाची किमती ऐवजाची बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल रिक्षा चालकाचा सत्कार करण्यात आला. राहुल गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अब्दुल मिस्त्री दुबईवाले तसेच रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी यांच्या पुढाकाराने ही बॅग परत मिळाली त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. बेळगावात आलेले महेश जगजंपी यांना त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरल्याचे लक्षात आले. मात्र ती रिक्षा नवीन असल्यामुळे नंबर नव्हता. त्यामुळे शोध घेणे कठीण होते. मात्र कंपनी व्यवस्थापक समीरअली खिलारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तसेच पोलीस आयुक्तांना माहिती देऊन याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर कॅम्प पोलीस स्थानकात रिक्षा चालकाला बोलावून सदर बॅग मूळ मालकाकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आली. यावेळी पदाधिकारी मोहम्मद अयाज शेख, काशिनाथ वहाबंद, रिजवान पठाण यांचे सहकार्य लाभले. यावेळी रोटेरियन विनयकुमार बाळीकाई, राजेंद्र देसाई, लिंगराज जगजंपी, शिवानंद पाटील, महादेव केरकर आणि इतर सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta