बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिनी मूक सायकल फेरीत सहभागी झालेल्या एकीकरण समिती नेत्यांसह कार्यकर्त्यांवर मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी कर्नाटक सरकारने मराठी भाषिक वकील आणि पत्रकारांवर देखील गुन्हे नोंदविले आहेत.
ऍड. महेश बिर्जे, ऍड. अमर येळ्ळूरकर, ऍड. सुधीर चव्हाण या वकिलांसह सुहास हुद्दार या पत्रकारावर सुध्दा गुन्हा दाखल आहे.
जिल्हा प्रशासनाकडून काळा दिनासाठी परवानगी नव्हती तरीदेखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने मराठी भाषिक रस्त्यावर उतरले आणि भव्य अशी निषेध फेरी काढण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समिती गेली 68 वर्षे कायदेशीर मार्गाने केंद्र सरकारच्या विरोधात हा लढा लढत आहे. सीमालढा मोडीत काढण्यासाठी कर्नाटक सरकार वेळोवेळी प्रयत्न करीत असते यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे घालत असते परंतु यावेळी कर्नाटक सरकारने मराठी भाषिक पत्रकारांसह वकिलांवर देखील गुन्हे नोंद केले आहेत.
यामध्ये माजी आमदार मनोहर किनेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण पाटील, अमर येळूरकर, गजानन पाटील, नेताजी जाधव, अंकुश केसरकर, विकास कलघटगी, मदन बामणे, सचिन केळवेकर, प्रशांत भातकांडे, जयेश भातकांडे, महेश नाईक, किरण गावडे, महादेव पाटील, शुभम शेळके, रेणू किल्लेकर, सरस्वती पाटील, सरिता पाटील, किरण हुद्दार, दत्ता उघाडे, श्रीकांत कदम, चंद्रकांत कोंडुसकर, संतोष कृष्णाचे, गुंडू कदम, सुनिल बाळेकुंद्री, गणेश दड्डीकर, हनुमंत मजुकर, प्रकाश शिरोळकर, आर. एम. चौगुले, ऍड. सुधीर चव्हाण, मल्लाप्पा पाटील, नागेश पाटील, सुरज यळूरकर, श्रीकांत चव्हाण, सदा चव्हाण, किरण मोदगेकर, शिवाजी मंडोळकर, ऍड. महेश बिर्जे, सुहास हुद्दार, उमेश कुऱ्याळकर, ज्योतिबा पालेकर, बाबुराव केरवाडकर यांच्यासह 1000 ते 1500 अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.