बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वामध्ये आज सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याला बेळगाव ते बाची दरम्यानचा रस्ता नूतीकरण करावा अशी मागणी करून निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता शशिकांत कोळेकर व संजय गस्ती यांना पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. अन्यथा सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी उचगाव रस्त्यावरील मधुरा हॉटेल जवळ रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी असिस्टंट एक्झक्युटिव्ह इंजिनिअर शशिकांत कोळेकर यांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. तरी सरकारी कामकाजासाठी थोडा वेळ लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर कोणत्याही परिस्थितीत तात्काळ बेळगाव ते बाची या रस्त्याचे नूतनीकरण सुरू करावे, असा पवित्रा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला व तसे न झाल्यास भव्य रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आला.
यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, मोनप्पा पाटील, विठ्ठल पाटील, आर. के. पाटील, बि. एस. पाटील, बी. डी. मोहनगेकर, मोनाप्पा संताजी, मल्लाप्पा गुरव, अनिल पाटील, पियूष हावळ आदी उपस्थित होते.
या पार्श्वूमीवर उद्या मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक दुपारी २ वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली असून, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह, आजी माजी लोकप्रतिनिधी, कार्यकारिणी सदस्यानी, युवा आघाडी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर व सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta