बेळगाव : वाघवडेचे सुपुत्र, मराठी आणि कोकणी लेखक, उजवाड या कोकणी मासिकाचे उपसंपादक मिनीन गोन्साल्विस यांची अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या सर्वसाधारण मंडळावर कर्नाटकातून निवड झाली असल्याचे पत्र अभाकोपचे सरकार्यदर्शी गौरीश वेर्णेकर यांनी पाठविले आहे.
अ.भा.को. परिषदेच्या घटना क्रमांक पाच प्रमाणे पुढील दोन वर्षांसाठी परिषदेच्या सर्वसाधारण मंडळावर गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील प्रत्येकी दोन आणि पूर्ण भारत देशातून दोन अशा दहा सभासदांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून मेल्विन फॅर्नांडीस, अरविंद बार्देसकर, कर्नाटकातून मिनीन गोन्साल्वीस, राकेश मिनेंझिस, केरळमधून स्टेनी बेळा डिसोझा, गणेश पी. आर., गोव्यामधून फिलोमिना साॅंफ्रान्सिस्को, सेराफीन कोता, कृष्णकुमार के. एस. आणि स्नेहा सबनीस (गोवा) याप्रमाणे पूर्ण भारत देशातून 10 जनांची निवड करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta