येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वडगाव शाखेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील होते.
प्रास्ताविकात संस्थेचे संचालक प्रा. सी. एम. गोरल यांनी संस्थेच्या नऊ वर्षाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यानंतर संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील, व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, संस्थेने गेल्या 23 वर्षात संस्थेचे भागधारक, ठेवीदार, पिग्मी संकलक, कर्मचारी वर्ग व हितचिंतक यांच्या साथीने चांगली प्रगती साधली असून, संस्थेच्या येळळूर व वडगाव येथे स्वतःच्या इमारती आहेत. संस्थेने कायमच सामाजिक बांधिलकी जपली असून, संस्थेच्या वतीने येळळूर येथे नेताजी मंगल कार्यालयाची उभारणी केली आहे. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे. यावेळी व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनीही संस्थेच्या कार्याबद्दल गौरोवोद्गार काढले. वर्धापन दिनानिमित्त वडगाव शाखेमध्ये लक्ष्मीपूजनाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसंत मुचंडी, दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, विजय धामणेकर, रवी कणबरकर, कल्याणी पावले, मुक्ता लोहार, संध्या चव्हाण आदी उपस्थित होते. सेक्रेटरी दीपक हट्टीकर यांनी आभार मानले.