Thursday , November 21 2024
Breaking News

बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपासने घेतला जुनेबेळगाव येथील शेतकऱ्याचा बळी

Spread the love

 

बेळगाव : गेल्या 2011 पासून आजपर्यंत बेकायदेशीर तसेच शेतकऱ्यांची सहमती न घेता, विरोधी आंदोलन मोडित काढत मा. न्यायालयाचा आदेशही पायदळी तुडवत महामार्ग प्राधिकरण खाते पोलिस खात्याच्या मदतीने ठेकेदार हालगा-मच्छे बायपास करण्यात गुंतले आहे. 2011 पासूनते आजपर्यंत या पट्यात अनेकांनी धास्तीने तसेच, आत्महत्या करुन घेत अनेक शेतकऱ्यांनी जिवन संपवले. मच्छे येथील युवा कार्यकर्त्याने आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर परिणाम होऊन शेतकरी व महिला सैरभैर होऊन वेडे होत आपल घरही सोडून गेले. त्याची रितसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखलही आहे.
आता परत गेल्या कांही दिवसापासून मा.न्यायालयात दावा प्रलंबीत असतानांही तिकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराने बायपासचे काम सुरु केल्याने जूनेबेळगाव येथील शेतकरी यल्लाप्पा चन्नाप्पा टपाले (वय 65) हे आपल्या शेतात पीक लावल आहे ते तर जाणारच पण वडिलधाऱ्यानीं राखलेली शेती आपल्या हयातीत घालवणार या धास्तीने पूढे काय खाणार अशा घोर निराशाने ते अत्यवस्थ झाले आणि त्यांनी अंथरुण पकडले त्यातच त्यांचा बुधवार दि. 13/11/2024 रोजी दुपारी मृत्यू झाला. महामार्ग प्राधिकरणाने बळी घेतला यात तिळमात्र शंका नाही. कारण त्यांची पत्नी बायपासमधील शेतकऱ्यासमवेत प्रत्येक आंदोलनातच नव्हे तर मा.उच्च न्यायालयात दावा असताना सुनावनीवेळी जातिने हजर रहात असे. हि शेतकरी महिला आपले शेत सांभाळत पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात पॉवरलूमवर काम करुन आपला उदरनिर्वाह चालवायची. कारण फक्त शेतीवर घर चालवणं कठिण होतं. आता त्यांची पत्नी एकाकी पडल्याने बायपासमधील जमीनीचा तुकडाच त्यांना आधार. मुलं नसल्याने त्यांना आता हालाकीच जीवन जगाव लागल्याने पत्नी म्हणते कि माझ्या नवऱ्याचा बळी महामार्ग प्राधिकरणानेच घेतला. आतातरी प्रशासन, महामार्ग प्राधिकरण खाते बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास रद्द करणार कि असे अनेक बळी गेलेतरी चालतील पण बायपास करणारच या मुजोरीत वागणार?

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात ‘वक्फ’साठी शांततेत मतदान

Spread the love  बेळगाव : अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यातील वक्फ बोर्डाच्या निवडणुका बेळगावात शांततेत पार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *