Friday , May 16 2025
Breaking News

केदनूरचे सुपुत्र नारायण पाटील यांना मानद डॉक्टरेट बहाल…

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील केदनूर गावातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन स्वतःची एक ओळख निर्माण करून यशाची शिखरे पदाक्रांत करीत विविध बहुमान मिळवणाऱ्या नारायण लक्ष्मण पाटील यांना इंटरनॅशनल ह्युमन डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीकडून त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

आजपर्यंत अनेक संस्थाना त्यांनी आर्थिक मदत केली आहे. तसेच अनेक संस्थानी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केदनूर झाले असून जीएसएस कॉलेजमधून त्यांनी बीएससी ही पदवी प्राप्त केली. बेळगाव येथील इंडाल कारखान्यांमध्ये कामगार म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. तिथूनच पुढे त्यांना दुबई येथे काम करण्याची संधी मिळाली आणि दुबई येथे काम करत असताना आपल्या अंगी असलेल्या कौशल्याने आणि कष्टाने ते बढती मिळवत कंपनीच्या उच्चपदावर कार्यरत राहिले. दुबई येथील अल्युमिनियम कंपनीने त्यांना चीन येथे पाठवले. चीनमधील अनेक अल्युमिनियम कंपन्यांना त्यांनी भेटी दिल्या.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अल्युमिनियम उद्योगातील मोठा अनुभव असणारे नारायण पाटील सध्या बेळगावातील अनेक शिक्षण संस्थांना मदत करत आहेत. संस्था पुढे याव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. श्री शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज कडोली इंग्लिश मीडियम हायस्कूल कडोली या ठिकाणी ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. प्राथमिक शाळेच्या तसेच आंबेडकर हायस्कूल केदनूर येथे शाळा सुधारणा कमिटीमध्ये आहेत. धर्मवीर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे ते उपाध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. तसेच ते इंडियन फार्मर ऑर्गनायझेशन ऑफ बेळगावचे अध्यक्ष आहेत.

About Belgaum Varta

Check Also

खोटी बातमी पसरवणाऱ्या अनिस उद्दीन विरोधात गुन्हा दाखल

Spread the love  पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांची माहिती बेळगाव : कर्नल सोफिया कुरेशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *