बेळगाव : चव्हाट गल्ली कावळेवाडी (ता. बेळगाव) येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते ओमानी गावडू मोरे (वय ८०) यांचे गुरुवारी (ता.१४) दुपारी ४ वाजून ४२ मिनीटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, तीन बहिणी, नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी (ता.१५) सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीचे ज्येष्ठ नेते, निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्यामुळे समितीचे नुकसान झाले आहे. त्यांनी गावात मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य तसेच दुध डेअरीची सुरुवात केली. चव्हाटा महिला दूध उत्पादक संघाचे संस्थापक होते. तसेच कर्नाटक दुध डेअरीचे संस्थापक, अध्यक्ष होते. बेळगुंदी येथील रविकीरण को. ऑप सोसायटीचे माजी संचालक होते. तसेच बिजगर्णी ग्राम पंचायतीचे माजी उपाध्यक्ष होते.
Belgaum Varta Belgaum Varta