
बेळगाव : येथील जयश्री फर्निचर उद्योग समूहाच्या दुसऱ्या युनिटचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १५) मारुती मंदिर, ब्रह्मनगर, उद्यमबाग येथे होणार असून नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जयश्री फर्निचर उद्योग समूहाचे चेअरमन यल्लाप्पा रेमाण्णाचे यांनी केले आहे. सायंकाळी ४.३० वा. उद्यमबाग येथील डीआयसीचे जॉईंट डायरेक्टर सत्यनारायण भट्ट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव राजेंद्र मुतगेकर, म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, धामणे (एस.) ग्रा.पं अध्यक्ष पंडित पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
धामणे (ता. बेळगाव) येथील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले यल्लाप्पा रेमाण्णाचे १९८५ दरम्यान दुसरीकडे कामाला जात होते. यातूनच त्यांनी कलाकौशल्याला वाव देत स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला फोर्ट रोड येथे दुकान सुरु केले. यानंतर त्यांनी गोवावेस येथे जयश्री फर्निचर शोरुम सुरू केले. त्यांना २०२० मध्ये सांगली येथील प्रतिष्ठित उद्योग भूषण पुरस्कार मिळाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta