बेळगाव : बी के मॉडेल हायस्कूलमध्ये प्रथम विषय मराठी विषयाची कार्यशाळा संपन्न. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. जोशी, प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहर क्षेत्र शिक्षणाधिकारी माननीय श्री. रवी बजंत्री, एस. एस. एल. सी. नोडल अधिकारी श्री. रिजवान नावगेकर, मराठी फोरम अध्यक्ष श्री. संजय नरेवाडकर, एस. टी. एफ नोडल अधिकारी श्रीमती प्रिया सायनेकर, संपन्नमुलव्यक्ती श्री. सी. वाय. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती, गणेश स्तवनाने झाली. मराठी फोरमच्या वतीने पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शिक्षकांना मार्गदर्शन करताना क्षेत्र शिक्षणाधिकारी मा. श्री. रवी. बजंत्री यांनी भाषेचे महत्त्व आणि स्वरूप पटवून दिले. शिक्षकांना हसत खेळत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत नीलनक्षा व प्रश्नपत्रिका आणि स्वरूप यावर दिवसभर कार्य झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. राम गुरव व आभार प्रदर्शन श्री. बी. जी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाला बेळगाव शहरातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta