Wednesday , March 4 2026
Breaking News

राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना जाहीर

Spread the love

 

बेळगाव ‌: पत्रकारिता, शिक्षण, समाजसुधारणा या क्षेत्रात भरीव कार्य केलेले राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ नेते, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, घोंगडी व पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

ज्योती महाविद्यालय, क्लब रोड बेळगांव येथे बुधवार दि. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी राहाणार आहेत. त्यांच्याच हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य, लेखक व पत्रकार कॉम्रेड भालचंद्र कांगो याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
कॉ. कृष्णा मेणसे हे ज्येष्ठ कामगार नेते, साहित्यिक व पत्रकार आहेत. स्वातंत्र्य लढा, सीमालढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवा मुक्ती आंदोलन व विविध कामगार चळवळीचे नेतृत्व त्यांनी केले आहे. गोठलेली धरती पेटलेली मने, परिक्रमा, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर, क्रांतिसिंह नाना पाटील, हो चि मिन्ह, असा लढलो असा घडलो आदी पुस्तके त्यांची प्रसिद्ध झाली आहेत. या त्यांच्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

या पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष आहे. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. बाबा आढाव, डॉ. माणिकराव उर्फ भाऊसाहेब पोटे, डॉ. आ. हे. साळुंखे, भाई एन. डी. पाटील, पन्नालाल सुराणा व डॉ. भारत पाटणकर यांना देण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *