Wednesday , March 4 2026
Breaking News

जिल्हास्तरीय मलखांब स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद

Spread the love

 

बेळगाव : रामदुर्ग येथील ज्ञान अमृत वरिष्ठ प्राथमिक विद्यालय तोरणगट्टी येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या मलखांब व रोप मल्लखांब स्पर्धेत अनगोळच्या संत मीरा इंग्रजी शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत 3 तालुक्यातील शालेय संघानी भाग घेतला होता.
संत मीरा शाळेच्या प्राथमिक मुलींच्या गटातील गायत्री प्रसाद मजुकर, कृतिका महातेश हिरेमठ, मुलांमध्ये निलेश अनिल पैलवाण्णाचे तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात सिद्धी लाटुकर, तानी बेळगांवकर, राशी असलकर, चैत्रा दास, प्रणाली मोदगेकर, रितूशा जवरूचे तर माध्यमिक मुलांच्या गटातील प्रज्वल विजय मावळगी, पार्थ प्रसाद थोरात यांची आगामी बागलकोट येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे, संत मीरा शाळेच्या मलखांब खेळाडूंना प्रशिक्षक सुरज देसुरकर, अनुराधा पुरी शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट, यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शिक्षक व पालक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *