बेळगाव : कंग्राळी ग्राम पंचायतचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री. यल्लोजीराव पाटील यांनी पंचायत सदस्यांना मिळणाऱ्या मासिक मानधनातून सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून कपडे, मिठाई आणि प्रत्येकी पैसे वाटप करून एक वेगळा आदर्श घडविला. दरवर्षी मिळणाऱ्या आपल्या वैयक्तिक पंचायत अनुदानाचा ते अशाप्रकारे वाटप करतात. ग्राम पंचायत सदस्य यल्लोजी तानाजी पाटील यांनी स्वतः मानधन व मिठाईचे वाटप केले.
प्रास्ताविक आणि स्वागत कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta