बेळगाव : संतश्रेष्ठ कनकदास यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आज बेळगावात संतश्रेष्ठ कनकदास यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री अमरेश्वर महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत महापौर सविता कांबळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, अशोक सदलगे आदी मान्यवरांनी मिरवणुकीचा शुभारंभ केला.
कनकदास सर्कल येथून निघालेली ही मिरवणूक अशोक सर्कल, आरटीओ सांगोली रायण्णा सर्कल, एसपी ऑफिस मार्गे कुमार गंधर्व कला मंदिरात येऊन संपली. माजी महापौर यल्लाप्पा कुरबर, हेस्कॉमचे निवृत्त अभियंता अश्विन शिंदे, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, वकील आर. पी. भजंत्री आदींचा सहभाग होता.
Belgaum Varta Belgaum Varta