Wednesday , March 4 2026
Breaking News

ब्रेक फेल झाल्याने मुनवळ्ळी-सौंदत्ती येथे अपघात : दोघांचा मृत्यू

Spread the love

 

सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावाच्या बाहेर क्रूझर वाहनाचे ब्रेक फेल होऊन, वाहन रस्त्यावरून पलटी होऊन यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या अपघातात १७ जण जखमी झाले आहेत.
सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावाच्या बाहेर क्रूझर वाहनाचे ब्रेक फेल होऊन रस्त्यावरून पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये ६० वर्षीय केंचप्पा लक्ष्मण ईरन्नवर यांचा तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. इतर १७ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची परिस्थिती गंभीर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १८ जण चूंचनूर, रामदुर्ग तालुक्यातून नवलगुंद तालुक्यातील हेब्बाळी गावी कामावर गेले होते. काम संपवून आपल्या गावी परत जात असताना हा अपघात झाला. घटनेनंतर सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *