
बेळगाव : बेळगाव महापालिकेचे अधिकारी आज सकाळीच सक्रिय झाले असून, शहरात कर न भरलेल्या दुकानदारांविरुद्ध आणि अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरवात केली आहे. आज सकाळी बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरातील नेहरू नगर येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेज समोर असलेल्या दत्त वडाप सेंटर, सलगर अमृत चहा कॅफे, अंबारी ज्यूस सेंटर येथून अतिक्रमण हटवून, कर न भरणाऱ्या दुकानांना कुलुप लावले गेले. तसेच बेळगाव महापालिकेने कर, भाडे थकबाकी असलेले आणि अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई केली आहे. महापालिकेच्या मालकीच्या एकूण 14 दुकानदारांपैकी फक्त 3 जणांनी भाडे भरले आहे, अन्य दुकानांची एकूण 36 लाख रुपयांची थकबाकी आहे. म्हणूनच ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. करदात्यांनी त्यांची जबाबदारी ओळखून कर भरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे अधिकारी म्हणाले. महसूल अधिकारी अनिल शेट्टर यांच्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta