बेळगाव : अनेक राज्यांमधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानसाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयासमोर मांडण्यात आला आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन लोकापुर – सौंदत्ती धारवाड, या नव्या रेल्वे मार्गाची मागणी केली आहे. या रेल्वेमार्गामुळे लाखो रेणुका भक्तांची चांगली सोय होणार आहे. असेही खासदार आहे शेट्टर यांनी सांगितले आहे.
यावेळी पुढे बोलताना खासदार शेट्टर म्हणाले, २०१९ मध्ये, रेल्वे विभागाने प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी प्राथमिक टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते, कालांतराने सदर रेल्वे मार्गाचे काम झाले नाही.
२०२२-२३ या वर्षात (एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत) देशाच्या विविध भागातून अंदाजे एक कोटी तेवीस लाख भाविकांनी सौंदती येथील श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले. तसेच केंद्र शासनाच्या अनुदानातून सौंदत्ती रेणुका देवस्थान या परिसरात यापूर्वीच विविध योजना मार्गी लावण्यात आल्या आहेत. याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच रेल्वे मार्ग निर्मितीबाबत सर्वेक्षणासाठी चर्चा झाली
Belgaum Varta Belgaum Varta