बेळगाव : बेळगाव जिल्हा औषध गोदामावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला. यावेळी आरएलएस आयव्ही ग्लुकोजचे अनेक बॉक्स आढळून आले.
आरएलएस आयव्ही ग्लुकोज हे बेल्लारी हॉस्पिटलमधील बाळंतिणींच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या तज्ञांच्या अहवालानंतर आरोग्य विभागाने या ग्लुकोजवर बंदी घातली आहे. सर्व रुग्णालयांना या ग्लुकोजचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील जिल्हा औषध गोदामावर लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली 8 अधिकाऱ्यांच्या पथकाने गोदामावर छापा टाकून तपासणी केली. त्यावेळी सदर ग्लुकोजचे 10 पेक्षा जास्त बॉक्स सापडले. मुदत संपलेल्या औषधांच्या आणखी अनेक पेट्या सापडल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी औषध गोदामाची तपासणी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta