Saturday , December 13 2025
Breaking News

एंजल फाउंडेशनच्या वतीने आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार

Spread the love

 

बेळगाव : बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व एंजल फौंडेशन ग्रामीण विकास व शिक्षण संस्थेतर्फे आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धां मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस वितरण समारंभ एंजल फौंडेशन संस्थापक अध्यक्षा सौ. मीनाताई बेनके यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री. दीपक सुतार, स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, एंजल बेनके, अलिष्का बेनके, स्केटिंग पट्टू व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या स्केटिंग पट्टूंचा एंजल फाउंडेशनच्या वतीने स्टीलच्या वॉटर बॉटल देऊन सन्मान करण्यात आला.

सत्कार केलेल्या स्केटर्सची नावे खालील प्रमाणे

हिरेन एस राज, अथर्व हडपड, अवनीश कोरीशेट्टी, द्रीष्टी अंकले,
जयध्यान एस राज, रश्मिता डी अंबिगा, देवेन व्ही बामणे, अभिषेक नवले, अनुष्का शंकरगौडा, खुशी घोटीवरेकर, शेफाली शंकरगौडा, अन्वी सोनार, सई शिंदे, शर्वरी दड्डीकर, मुदालसिक्का, साईराज मेंडके, सई पाटील, तीर्थ पाचापूर, सिद्धार्थ काळे, अवनीश कामंननवर, सौरभ साळोखे, जानवी तेंडुलकर, विराज पाटील, संयम पाटील, अनघा जोशी, भव्य पाटील, सत्यम पाटील, आर्या कदम, प्रांजल पाटील, विशाखा फुलवाले, खुशी आगशिमनी, आराध्या पी,

या स्पर्धेय यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, सोहम हिंडलगेकर, गणेश दड्डीकर, सक्षम जाधव, सागर चौगुले, साई समर्थ तुकाराम पाटील, वैष्णवी फुलवाले व इतर यांनी सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगुंदी येथे शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अतिप्रसंग; गावकऱ्यांनी शिक्षकाला चोपले

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *