बेळगाव : मार्कंडेयनगर ए.पी.एम.सी. बेळगांव येथील स्वयंभू श्री वरदविनायक मंदिराचे कळसारोहण व धनलक्ष्मी – सरस्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दि. 6/12/2024 रोजी करण्यात आली.
बऱ्याच वर्षांनी आलेला दुर्मिळ मुहुर्त मार्गशीर्ष शुक्लपक्ष क्रोधीसंवस्तर 1946 श्रवण नक्षत्रमध्ये कारंजीमठ बेळगांवचे म.नि.प्र. गुरुसिध्ध महास्वामीजी यांच्या हस्ते कळसारोहण व प्राणप्रतिष्ठापना पार पडली. पौरोहित्य बैलहोंगल दुर्गा परमेश्वरी मंदिराचे महातेंश स्वामी व संगमेश्वर मंदिराचे पुजारी बसवराज स्वामी, संगमेश्वर नगर बेळगांव यांनी केले.
या संदर्भात माजी खासदार मंगला अंगडी, समाजसेवक मोहन कारेकर, विकास कलघटगी, बांधकाम व्यावसायिक आर. एम. चौगुले व इतर अनेक जण प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरातील पंच कमिटी, महिला मंडळ, जेष्ठ सौ. सुनंदा पाटील, भरत कंग्राळकर, गजानन मेंडके, राजू बाळेकुंद्री, महांतेश पाटील, प्रविण शिरोडकर, प्रविण बिडीकर, प्रकाश मुतगेकर आदींनी विशेष परीश्रम घेतले. गेल्या तीन डिसेंबर पासून रोज सायंकाळी 7 वाजता मार्कंडेय नगर महिला मंडळाच्या वतीने अखंड ललित सहस्त्रनाम पठण व भजन सुरू आहे. हजारो भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला मंदिराचे प्रमुख व्यवस्थापक श्री. मल्लिकार्जुन सत्तिगेरी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.