बेळगाव : वेदांत सोसायटी आणि मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच बेळगाव शहर आणि तालुक्यातील विविध संघ संस्थांशी संलग्न राहून कार्यरत असलेले कै. बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त आज भारत नगर येथील वेदांत सोसायटी कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेब भेकणे हे मित्रत्वाचे नाते राखणारे म्हणून सर्वांना परिचित होते. बाबासाहेब भेकणे यांच्या निधनामुळे बेळगाव आणि परिसरातील युवकांना प्रोत्साहन देणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व हरवले अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसभेत बोलताना मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक आर. आय. पाटील म्हणाले, बाबासाहेब भेकणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यात नेहमीच कार्यरत होते. मार्कंडेय साखर कारखान्याच्या प्रगतीचा ध्यास त्यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
माजी नगरसेवक मनोहर हलगेकर म्हणाले, निंगाप्पा भेकणे यांच्याकडून त्यांच्या दोन्ही मुलांना सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. कुलदीप आणि बाबासाहेब दोघेही समाजकार्यात हिरीरीने सहभाग असतो. बाबासाहेब भेकणे यांच्या निधनाने मोठी हानी निर्माण झाली आहे.
देवकुमार बिरजे म्हणाले, बाबासाहेब भेकणे यांच्या निधनामुळे बेळगावातील मराठा समाजाची मोठी हानी झाली आहे. कविता फडके म्हणाल्या, बाबासाहेब भेकणे हे गरजू गरिबांना नेहमीच मदतीचा हात देण्याचे काम करत होते.त्यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. याचबरोबर नारायण पाटील, शिवाजी कुट्रे, वैभव खाडे, प्रकाश अष्टेकर, मार्कंडे साखर कारखान्याचे आर. आय. पाटील, अनिल अंबरोळे, संतोष शिवणगेकर, वेदांत सोसायटी पदाधिकारी स्टार आणि पिग्मी कलेक्टर यांनीही बाबासाहेब भेकणे यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आणि श्रद्धांजली वाहिली.
शोकसभेत प्रारंभी वेदांत सोसायटीचे चेअरमन संदीप खन्नुकर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांनी कै. बाबासाहेब भेकणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. जयवंत खन्नुकर यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर सायनेकर, निलेश कटांबळे, कृष्णा धामणेकर, सोमराज भेकणे, चंद्रकांत धामणेकर यांच्यासह शहापूर, खासबाग, वडगाव, आनंदवाडी, जुने बेळगांव आणि बेळगाव परिसरातील बहुसंख्य नागरिक व संघ संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.