Monday , April 14 2025
Breaking News

जीएसएस महामेळावा नावनोंदणी मुदतीत वाढ

Spread the love

 

वाढत्या प्रतिसादामुळे निर्णय : १६ डिसेंबरपर्यंत करता येणार नावनोंदणी

बेळगाव : जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘सक्सेरियन्स २४- रीकनेक्ट अँड रीजॉईस’ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यासाठी नावनोंदणी करण्याची अखेरची मुदत ३० नोव्हेंबर होती. परंतु, माजी विद्यार्थ्यांची वाढता प्रतिसाद व मागणीचा विचार करुन ही मुदत १६ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय सुकाणू समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्राचार्य अरविंद हलगेकर अध्यक्षस्थानी होते.

जीएसएस महाविद्यालयाला नुकताच स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा प्राप्त झाला आहे. याबाबतची माहिती माजी विद्यार्थ्यांना व्हावी. या आनंदात सहभागी होण्याबरोबरच जुन्या मित्र मैत्रिणींना महाविद्यालयाच्या आवारात पुन्हा भेटता यावे यासाठी २८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यात महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचपासूनचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हजारहून अधिक माजी विद्यार्थी सहभागी होतील असा अंदाज आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक जणांनी ऑनलाईन नोंदणी केली असून हा ओघ सुरुच आहे. रोज १५ ते २० माजी विद्यार्थी नावनोंदणी करत आहेत. सुरवातीला महामेळाव्यात नोंदणी करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची मुदत होती. परंतु, शेवटच्या दिवशी नावनोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यामुळे, ही मुदत १६ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

महामेळावा समिती सोहळ्याचे नियोजन करत असून विविध माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. महामेळावा अविस्मरणीय व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी विविध समित्या स्थापून जबाबदाऱ्यांचे पार पाडल्या जात आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी केली जात असून अधिकाधिक विद्यार्थी त्यात सहभाग नोंदवत आहेत. बेळगावबाहेर राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनाही महामेळाव्यात सहभागी होता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाढीव मुदतीत अधिकाधिक माजी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी khandekar@gssbgm.edu.in या ईमेलवर किंवा ९८४४९२२४९६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे. बैठकीला माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. भरत तोपिनकट्टी, उपाध्यक्ष अनंत लाड, सचिव प्रा. संदीप देशपांडे, महामेळावा समितीचे अध्यक्ष कुलदीप हंगिरगेकर, प्रा. अभय सामंत, महामेळावा समितीचे सचिव प्रा. अनिल खांडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

——————————————————————-

दिवसभरातील कार्यक्रम
– सकाळी १० ते ११ : नोंदणी
– सकाळी ११ ते १२ : उद्धाटन व सन्मान सोहळा
– दुपारी १२ ते २.३० : पुनर्मिलन व जुन्या आठवणींना उजाळा
– दुपारी २.३० ते ३.३० : स्नेहभोजन व समूह छायाचित्र
– दुपारी ३.३० नंतर : सांस्कृतिक कार्यक्रम

About Belgaum Varta

Check Also

17 ते 20 एप्रिलदरम्यान अनगोळ येथे बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत

Spread the love  बेळगाव : मागील वर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहरातील अनगोळ येथे भव्य बैलगाडा पळवण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *