Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगावमध्ये महामार्गावर मार्ग रोखून पंचमसाली समाजबांधवांचे आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : पंचमसाली समाजाने हिरेबागेवाडी महामार्गावर रास्ता रोको करून सरकारच्या धोरणाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
२ ए आरक्षणासाठी कुंडलसंगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णसौधसमोर आंदोलन करण्यात आले. सुवर्णसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा तीव्र निषेध करत आज राज्यभर पंचमसाली समाजाने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आज बेळगावच्या हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ महामार्ग रोखून पंचमसाली समाजाचे लोक आंदोलन करत होते. सरकारच्या धोरणांचा निषेध करत धिक्काराच्या घोषणा देत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
कुडलसंगम गुरु पीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी याबद्दल सांगितले की, पंचमसाली समाजाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणे हे निषेधार्ह आहे. आज राज्यभर पंचमसाली समाज हल्ल्याच्या विरोधात लढत आहे. पंचमसाली समाजावर जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी सार्वजनिकपणे माफी मागितली पाहिजे. सोमवारी सुवर्णसौधसमोर समोर धरणे सत्याग्रह सुरू होईल. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याबाबत स्पष्टपणे बोलावे, “आरक्षण देतो” असं सांगावे. नाहीतर “देणार नाही” असं स्पष्टपणे सांगावं, पण आता आम्ही आरक्षणाची मागणी करत नाही, आम्ही २०२८ मध्ये आम्ही आम्हाला हवे ते सरकार सत्तेवर आणू, असेही स्वामीजींनी सांगितले. यावेळी पंचमसाली समाजाचे शेकडो सदस्य सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये विशेष ‘करिअर मार्गदर्शन’ सत्राचे आयोजन

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *