“जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणेच आमचे बंधू कै. बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांची अचानक झालेली “एक्झिट” मनाला चटका लावून गेली. अगदी रात्रीपर्यंत आमच्या सर्वांशी गुजगोष्टी करणारे सकाळी अचानक आमच्यातून नाहीसे झाले. दि. 2 डिसेंबर 2024 रोजी श्री. बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांना देवाज्ञा झाली. आज बारावा दिवस त्यानिमित्ताने….
“भेकणे” कुटुंबीयांचा आधारवड म्हणजे कै. निंगाप्पा भेकणे (अण्णा) यांच्यानंतर त्यांची दोन्ही मुले कुलदीप आणि बाबासाहेब यांनी कुटुंबाचा वारसा पुढे चालवत सामाजिक बांधिलकी जोपासली.
कै. बाबासाहेब भेकणे हे परिवाराचे शेंडेफळ मात्र प्रत्येक उपक्रमात अगदी पुढे. मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक म्हणून मागील दीड – दोन वर्षांपासून सामाजिक कार्यात पुढाकार होता. वेदांत सोसायटी, शहापूर मुक्तिधाम तसेच विविध मंडळांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. कुटुंबासाठी मार्गदर्शक असणारे, प्रोत्साहित करणारे बाबासाहेब भेकणे अचानक सोडून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे अचानक जाणे दुःखाच्या खाईत लोटणारे ठरले. आई, पत्नी, मुले, भाऊ, बहीण, वहिणी, पुतण्या, पुतणी, यांच्याशी असणारा रोजचा संवाद आता थांबला आहे. यामुळे तुमचे जाणे सर्वांनाच पोरके करून गेले. तुम्हाला विसरणे अशक्य आहे. तुम्ही नेहमीच आमच्या मनात; क्षणात असाल.
तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! आमच्या “भेकणे” परिवाराचा आधारवड असणाऱ्या आमच्या बंधूंना भावपूर्ण श्रद्धांजली!!
– राधिका सांबरेकर (पत्रकार)