बेळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हिजाब अथवा केसरी’ संदर्भात कोणाच्याही भावना दुखणाऱ्या वादग्रस्त पोस्ट करू नयेत. या पद्धतीने सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे आवाहन डीसीपी रवींद्र गडादी यांनी केले आहे.
दरम्यान, कर्नाटकातील हिजाब वादाशी संबंधित एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने काल तातडीची सुनावणी फेटाळून लावली. आम्ही योग्य वेळी हस्तक्षेप करू अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.
गुरुवारी न्यायालयानं यासंदर्भात तोंडी निर्देश दिले होते. कर्नाटकमध्ये काही महाविद्यालयांनी निर्बंध घातल्याप्रमाणे मुस्लीम मुलींना हिजाब घालण्याबाबत बंदी टाकणं हे त्यांच्या मूलभूत अधिकारांवर आणि धर्मस्वातंत्र्यावर अतिक्रमण ठरतं का? यासंदर्भात ही सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या सात पानी अंतरिम आदेशांची प्रत आता समोर आली असून त्यातून न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्वांनाच न्यायालयानं निर्देश दिले आहे. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या वर्गांमध्ये परतल्यास त्यांचं हित साधलं जाणार आहे. शैक्षणिक वर्ष शेवटच्या टप्प्यात आहे, अशी टिप्पणी मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित आणि न्यायमूर्ती जे. एम. काझी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठानं केली आहे.