माणगांव (नरेश पाटील) : शनिवार दि.12 फेब्रुवारी रोजी माणगांव नगर पंचायतीच्या नूतन नागराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा सत्कार वॉर्ड क्रमांक 16 च्या राहिवाश्यांकडून पवार यांच्या निवासस्थानी जाऊन केला. ज्ञानदेव पवार हे या वॉर्डातून भरघोस मतांनी निवडून आलेत. या सत्कार समारंभात ज्येष्ठ नागरिक भीमसेन वलेराव यांनी ज्ञानदेव पवार यांच्याबद्दलचे आपले विचार व्यक्त केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. किशोर डोंगरे यांनीही नवनिर्वाचित नागराध्यक्षना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
