बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांची कोवाड येथे भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आ. शिवाजी पाटील यांचा टक्केकर यांनी पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.
आमदार शिवाजी पाटील यांच्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाचा उल्लेख होता. निवडून आल्यानंतर आ. पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांचे स्मरण करून शपथ घेतली होती. यानिमित्त त्यांचे अभिनंदन करण्यासाठी टक्केकर यांनी आ. शिवाजी पाटील यांची भेट घेतली. यावेळी आ. शिवाजी पाटील यांनी बोलताना बेळगावशी माझे निकटचे संबंध असून सीमावासीयांच्या वेदनांची मला जाणीव आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि मराठी भाषिकांचे विविध प्रश्न मांडण्यासाठी अधिकाधिक वेळ देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सीमालढ्यासंदर्भात आपण चर्चा करत असल्याचे सांगितले.
यावेळी प्रसाद काकतकर, मारुती शहापूरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.